लोणंद: आस्था टाईम्स वृत्तसेवा – लोणंद नगरपंचायतीने केलेल्या डॉल्बी बंदीच्या ठराव विरोधात लोणंद मधील सर्वच गणेशोत्सव, नवरात्री उत्सव मंडळे आक्रमक झालेली आहेत. राज्य व जिल्हा स्तरावर कोणताही निर्णय झालेला नसताना देखील नगरपंचायतीने हा घाट का घातला हा प्रश्न तरुणाच्या मनात घाट करू लागला आहे.
आज डॉल्बी बंदीचा ठराव तातडीने रद्द करावा यासाठी लोणंद नगरपंचायतीवर सर्व सार्वजनिक मंडळांनी मोर्चा काढला होता. या मोर्चा मध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील, खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्फराज बागवान, युवा नेते प्रतीक क्षीरसागर, हिंदू एकता दौडचे सुनील बनकर, मराठी पतसंस्था संचालक राजेंद्र शिंदे, सचिन करंजे, संकेत माने एम, नितीन लाखे, मयूर क्षीरसागर, श्रीनाथ रासकर, रोहन वाईकर, कुमार पवार, मनीष इंगळे यांसह शेकडो तरुण यामध्ये सहभागी झाले होते.
लोणंद नगरपंचायतीने केलेला ठराव हा चुकीचा असून जो विषय अजेंठ्यावर नाही तो विषय आयत्यावेळी घेऊन सर्वानुमते मंजूर करण्याचा अधिकार पंचायतीस कोणी दिला, डॉल्बी बंदीचा ठराव केल्यानंतर व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन यांनी डॉल्बी बंदीची अर्ज दिल्याचे प्रसारमाध्यमामध्ये स्पष्ट केले परंतु ते अर्ज नगरपंचायतीने मागवून घेऊन तरुण वर्गात व व्यापाऱ्यांचा मध्ये भांडण लावण्याचा प्रकार काही सत्ताधारी नगरसेवकांने केला आहे, अशा प्रकाराला तरुणांनी व व्यापाऱ्यांनी बळी न पडण्याचे आव्हान व डॉल्बी बंदीचा केलेला ठराव लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा आक्रोश होईल असे आव्हान भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी नगरपंचायतीस केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वच सण हे मोठ्या उस्ताहात साजरे केले जातील, त्यासाठी कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही असे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केले आहे तरीही लोणंद नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात का निर्णय घेते हे कळत नाही असे सर्फराज बागवान यांनी सांगितले.
नगरपंचायतीने केलेला चुकीचा ठराव रद्द नाही केला तर उपोषण, आंदोलने असे वेगवेगळे प्रकार तरुणाई हातात घेईल असे दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.