(जावली/अजिंक्य आढाव) भारतीय सैन्य दलात राजस्थान मधील जोधपुर या ठिकाणी कार्यरत असलेले जावली गावातील सुपुत्र देविदास दिलीप रजपूत (वय 31) यांच देश सेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले,भाऊ,आई , अज्जी असा परिवार आहे.
गरीब कुटुंबांतील देविदास रजपूत अत्यंत शिस्तबद्ध हुशार म्हणून तरुणांना मधे ओळखला जायचा , सन 2017 साली इंडियन आर्मी मध्ये भरती झाला. पुढे ट्रेनिंग लखनऊ या ठिकाणी पूर्ण करत जम्मू या ठिकाणी देश सेवा बजावली नंतर पुणे या ठिकाणी बदली झाली मात्र राजस्थान मधील जोधपुर या ठिकाणी कार्यरत असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. वडीलांच्या अपघाती निधनानंतर आईने मुलांचे शिक्षण देत , लहान भाऊ हा सुद्धा सैन्यात भरती झाला. सध्या अमर हा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे . देविदास हा मोठा त्याच प्राथमिक शिक्षण जावली जिल्हा परिषद शाळेत घेत पुढील शिक्षणासाठी मुधोजी महाविद्यालय फलटण विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला उच्च माध्यमिक शिक्षण घेत झुलाॅजी डिग्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणाहुन प्राप्त केली.
फौजी देविदास रजपूत यांच्या वर उद्या दि 23 रोजी जावली या ठिकाणी सकाळी 8 वा अत्यंसंस्कार करण्यात आहे.
Back to top button
कॉपी करू नका.