फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने हा उत्सव साजरा करीत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करूनच गणेश उत्सव साजरा करावा असे प्रतिपादन फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी केले.

गणेश उत्सव २०२५ हा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक मंडळांशी समन्वय साधता यावा यासाठी फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करीत असताना तहसीलदार जाधव बोलत होते.

याप्रसंगी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुंभार साहेब, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, प्रादेशिक वाहन निरीक्षक श्रीमती स्वाती चव्हाण, महाराष्ट्र विद्युत पारशांचे रवींद्र ननावरे त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस पाटील व पत्रकार इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव हा सण आनंदाने साजरा करीत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा म्हणाले की, गणेशोत्सव काळातील २८/८ /२०२५ ते ३१/८/२०२५ व २/ ९ /२०२५ ते ५/९/२०२५ आणि दिनांक ६ /९ /२०२४ रोजी उत्सवाच्या दिवसासाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार विविध मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व दोन्हीवर्धक सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वाजवण्यास सूट देण्यात आली आहे.
तसेच श्री. जबरेश्वर मंदिर येथे सन – २०२४ मधील गणेशोत्सवा वेळी वाद्य वादनावर बंदी घातली होती.
यावर्षी सुद्धा या अनुषंगाने फलटणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर यांनी एका आदेशाद्वारे श्री. जबरेश्वर मंदिर फलटण येथील आसपासचा परिसर म्हणजेच गजानन चौकातील मोदी बिल्डिंग ते श्रीराम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा पर्यंत या रस्त्यावर २७ /८/ २०२५ ते ६ /९ /२०२५ कोणताही स्पीकर यंत्रणा वाजविण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सांगून शहा म्हणाले औद्योगिक क्षेत्रात ७० डेसिबल वाणिज्य क्षेत्रात ५५ निवासी क्षेत्रात ४५ डिसेंबर डेसिबल आणि शांतता क्षेत्रात ४० डेसिबल च्या वर १० डेसिबलने आवाज वाढविल्यास ध्वनी प्रदूषण समजून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही शहा यांनी सांगितले आहे.
या कालावधीमध्ये वाद्याची आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, पोलीस हवालदार अमोल रणवरे, पोलीस शिपाई मुकेश घोरपडे तसेच दोन पंचासहित असलेले पथक फलटण शहरातील प्रमुख ठिकाणच्या आवाजाची पातळी नोटीस लेवल मीटरने मोजण्याचे काम करीत आहेत.

गणेश उत्सव काळामध्ये फलटण नगर परिषदेच्या वतीने योग्य ती कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती ही यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिले आहे.
यावेळी महाविद्युत महावितरण विभागाचे प्रमुख रवींद्र ननावरे यांनी सांगितले आहे की, गणेशोत्सव काळात आमची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही अनेक गणेशोत्सव मंडळांना तात्काळ मीटर देण्याचे काम देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तरी प्रशासनास सर्व गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.