फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण शहरातील महत्त्वाचं मानलं जाणार गणेशोत्सव मंडळ म्हणजे राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ यंदा या मंडळाने आपल्या गणरायाचे आगमन साधेपणाने केले आहे. कारण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.बाबुराव गावडे यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असल्यामुळे यंदाच्या वर्षी गणरायाचे आगमन साधेपणाने करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मदने व उपाध्यक्ष शाहूजी मदने यांनी दिली.

फलटण शहरामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडळाच्या गणरायाचे आगमन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहाच्या वातावरणात पार पाडला पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते की, गणरायाचे आगमन पारंपारिक व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अटींचे पालन करून आपला गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करावा व आपल्या ध्वनी क्षेपकाची मर्यादा नियमानुसार असावी मात्र मर्यादेपेक्षा १० डेसिबलने ध्वनिक्षेपकाचा आवाज वाढल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार काही डी.जें.वर कारवाई देखील करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती प्राप्त होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.