ताज्या घडामोडी

रक्षक रयतेचा न्यूज यांच्यामार्फत महिलांसाठी “भव्य गौरी सजावट” आणि पुणे, सातारा जिल्ह्यातील महिलासाठी “सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे” आयोजन

फलटण :आस्था टाईम्स वृत्तसेवा – रक्षक रयतेचा न्यूज व विविध संस्थांच्या वतीने महिलांसाठी दिनांक 1सप्टेंबर रोजी भव्य गौरी सजावट आणि सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात बक्षीसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

रक्षक रयतेचा न्यूज,गगनगिरी ज्वेलर्स फलटण, सहयोग सोशल फाउंडेशन फलटण, शार्विच कॉस्मेटिक अँड ज्वेलरी ब्युटी पार्लर फलटण,मूळचंद मिल,भारतीय हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर आणि डेंटल क्लिनिक फलटण, चैतन आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र फलटण व कॉर्नर मोबाईल इलेक्ट्रॉनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील महिलांसाठी भव्य गौरी सजावट आणि पुणे सातारा जिल्ह्यातील महिलांसाठी सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रवेश फी आहे. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि हमखास गिफ्ट मिळणार आहे. दोन्ही स्पर्धेसाठी स्वतंत्ररित्या प्रथम क्रमांकाला एक ग्रॅम फॉर्मल नेकलेस, द्वितीय क्रमांकासाठी पैठणी, तृतीय क्रमांकासाठी आकर्षक गिफ्ट हॅम्पर,चतुर्थ क्रमांकासाठी डिनर सेट मिळणार आहे.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता टेलिफोन एक्सचेंज शेजारी नवीन नगरपालिका हॉल फलटण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे मोठ्या प्रमाणात बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.त्यामध्ये पैठणी गिफ्ट हॅम्पर, इस्त्री व विविध गिफ्ट मिळणार आहेत.
यावेळी भारती हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर व डेंटल क्लिनिक तर्फे उपस्थित महिलांची मोफत दंत तपासणी व मोफत वंध्यत्व तपासणी सल्ला दिला जाणार आहे त्याचप्रमाणे फलटण नगर परिषद फलटण तर्फे बचत गट व उपस्थित महिलांना शासकीय योजनांची व विविध कर्ज प्रकरणाची माहिती दिली जाणार आहे.
नाव नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा
8010 23 90 62, 70 57 83 16 88, 97 66 000 320, 94 20 99 99 17, 70 20 46 76 82, 92 84 27 49 13 74, 98 61 81 83,  88 30 31 12 13, 96 73 16 91 91

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.