ताज्या घडामोडी

ऐतिहासिक फलटण नगरीचे मराठे मुंबईत आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने एकवटले

फलटण प्रतिनिधी – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातील हजारो मराठा बांधव आझाद मैदान येथे आज शुक्रवार दि.29 रोजी सकाळी सकाळी पोहोचले त्यानंतर सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना भेट देत उपोषणास जाहीर पाठिंबा दिला व आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा शब्द दिला.

 
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेला फलटण तालुक्यात ऐतिहासिक अशा मराठा समाजाला एक वाटण्यासाठी तब्बल ५० शाखा मराठा क्रांती मोर्चाच्या उभारल्या या शाखांचे माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये मराठा समाज एकजुटीने संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला व 2016 पासून फलटण तालुक्यातील छोट्या छोट्या गावात मराठा क्रांती मोर्चाच्या शाखा उभारून समाजातील सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक अग्रेसर राहिले यामधून लाखो लोक राजकारण विरहित सामाजिक ऐक्य व हित जोपासण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा शाखांच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
दरम्यान गेली दोन ते तीन वर्ष झाले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत सामाजिक ऐक्य जोपासत संपूर्ण फलटण तालुक्यातील मराठा समाज राजकारणाचे जोडे बाजूला करून सन्माननीय मनोज दादाचा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला व संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक अशा फलटण नगरीचा आवाज अंतरवाली सराटी असो किंवा मुंबई असो यामध्ये हजारो तरुण आपल्या न्याय हक्कासाठी मनोज दादाचा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आज मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही कोणतीही तमा न बाळगता आझाद मैदानावर हजारो बांधव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजर होते.

चौकट – मुसळधार पाऊस,प्रचंड गर्दी, तीस तीस किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा,अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहने लावताना हटकले,तरीही आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने फलटणकर पोहोचले, अन् एकच आवाज घुमला आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा इशारा राज्य सरकारला दिला, व आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या…..
अशा आवाजाने आझाद मैदान परिसर दणाणून सोडला

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.