फलटण, आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण-दहिवडी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फलटण-दहिवडी मार्गावरील रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि कोणताही मोबदला न देता सुरू असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोळकी ते दुधेभावी या मार्गावरील गावांतील शेतकऱ्यांनी याबाबत श्रीमंत रामराजे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन रामराजे यांनी शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार, आज त्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नाची सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली.
श्रीमंत रामराजे यांनी पुढे सांगितले की, ते स्वतः नितीन गडकरी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या भेटीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.