ताज्या घडामोडी

जिल्हा नियोजन आराखड्यातील ३ टक्के निधी क्रीडा क्षेत्रासाठी राखीव ठेवा- उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धेचे शिष्यवृत्ती भरीव वाढ

मुंबई प्रतिनिधी- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज पार पडलेल्या बैठकीत घेतला. राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसंच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील ३ टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात यावा, त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात प्रतिभासंपन्न खेळाडू घडवण्यासाठी तसंच खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणं आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या राज्याप्रमाणे राज्यात ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’ उपलब्ध असणं आवश्यक असून यासाठी ‘मिशन लक्षवेध’ योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना ही यावेळी पवार यांनी दिल्या.

शासकीय सेवेत कार्यरत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या सरावात व्यत्यय येऊ नये, आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी त्यांना पाच वर्षे कालावधीसाठी विशेष सवलत देण्यात यावी, यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा. तसंच आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. त्या सर्व खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीनं उचित सन्मान करण्याच्या सूचना ही शेवटी बैठकीत दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.