फलटण प्रतिनिधी- संगिनी फोरम फलटण हि सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहून काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तपस्वीचां सत्कार जो सत्कार करण्यात आला आहे हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असा उपक्रम असल्याचे प्रतिपादन श्रीमंत सुभद्राराजे ना.निंबाळकर यांनी केले आहे.
संगिनी फोरम व स्पेक्र्टम ई सेंटर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या.
नुकत्याच संपन्न झालेल्या पर्युषन पर्वा मधे धर्म नगरी फलटण मधिल श्रावक-श्रावीका,लहान मुले-मुली यांनि प.पु अपुर्वसागरजी महाराज व प.पु अर्पितसागरजी महाराज याच्यां सानिद्यात अनुक्रमे ३२,१६.१०,५ व ३ ऊपवास केले होते.

या सर्व तपस्वीचां सत्कार बा.ब्र.नयनभैय्या, श्रीमंत सुभद्राराजे ना.निंबाळकर, प्रकाश दोशी (वाकडमाने), राजेंद्र कोठारी, स्मिता शहा, जैन सोशलच्या अध्यक्षां सविता दोशी, संगीनी फोरम अध्यक्षां अपर्णा जैन, श्रीपाल जैन, सचीव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, निना कोठारी, तुषार शहा, तेजस शहा,अर्चना गांधी यांचे हस्ते स्मिता शहा याच्यां सौजन्याने भेट वस्तु,मोत्याची माळ व श्रीफळ देऊन करण्यात आला.
३२ ऊपवास करणारे मंगल सुरेश दोशी, आलोक सुकुमार दोशी याचां विशेष सत्कार करण्यात आला.१६ ऊपवास करणारे ३ तपस्वी,१० ऊपवास करंणारे ७ तपस्वि,५ ऊपवास करणारे ३१ तपस्वी ,३ ऊपवास करणारे २४ तपस्वी या सर्वाचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सायकाॅलाॅजीस्ट स्मिता शहा यांचे मार्गदर्शनाखाली तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय विद्यार्थीनी गुणश्री रासकर, चैञाली सुतार, सुप्रीया जावळे, निकीता भारती, मोनिका खटके यांनी रंग मनाचे हा सुंदर कार्यक्रम सादर केला. माणसीक ताण-तणाव विरहित जीवन जगण्याबाबत या कार्यक्रमातुन प्रबोधन करण्यात आले.
तसेच श्रीलंका येथे योगा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवल्या बद्दल चैताली कोठारी, तृप्ती कोठारी याचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात किशोरी शहा, प्रज्ञा दोशी, मनिषा घडिया, जयश्री उपाध्ये याच्यां सुश्राव्य अशा मंगलाचरणाने करण्यात आले. मनीषा घडिया यांनी फेडरेशन सुत्र वाचण केले. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. संगीनी अध्यक्षां अपर्णा जैन यांनी प्रास्ताविकात संगीनी फोरमच्या कार्याचा आढावा सादर केला.
दिप्ती राजवैद्य यांनी सुंदर असे सुत्रसंचालन केले. तर खजीनदार मनिषा घडिया यांनी आभार प्रदर्शन केले.
Back to top button
कॉपी करू नका.