ताज्या घडामोडी
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान तर्फे माउलींच्या वारीतील वारकऱ्यांना मोफत औषधाचे वाटप
सामाजिक क्षेत्रात काम करणारी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान अग्रणी संस्था म्हणून परिचित

फलटण प्रतिनिधी- फलटण येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांती सूर्यप्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या वतीने अनेक ठिकाणी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटण शाखा उमाजी नाईक चौक फलटण, लोकमान्य नर्सिंग होम, व फलटण मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
या ठिकाणी लागणारी सर्व औषधे ही क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आली आहेत.





