ताज्या घडामोडी

मन, मेंदू व मनगट एकात्म झाल्याशिवाय चांगले चित्र साकारले जात नाही: फलटण बिल्डर असोसिएशनचा उपक्रम स्तुत्य -प्रांताधिकारी सचिन ढोले

भविष्यात भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनणार- प्रांताधिकारी सचिन ढोले

फलटण प्रतिनिधी- बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये मुलांनी मोबाईल या विषयाची कनेक्टेड असणारी सुंदर चित्रे रेखाटली असून त्यामध्ये हस्ताक्षर देखील छान आहे. त्या चित्रातून दिलेला संदेश सकारात्मक असा आहे. खरंतर या ठिकाणी चित्र काढताना मन, मेंदू व मनगट एकात्म झाले असल्यामुळेच चांगले चित्र साकारले गेले आहे असे प्रतिपादन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.


बिल्डर असोसिएशन ऑफ फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सचिन ढोले बोलत होते.


याप्रसंगी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, मोनिता ग्रुपचे श्री. प्रमोद अण्णा निंबाळकर, फलटण बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किरण दंडिले, उपाध्यक्ष श्री. सुनील सस्ते, फलटण बिल्डर असोसिएशनचे सेक्रेटरी स्विकार मेहता, श्री. संजय डोईफोडे, श्री. महेशशेट गरवालिया इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना पुढे प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले की, आजची मुले ही खूप प्रज्ञावंत व हुशार आहेत सध्या ही मुले शिकत आहे त्यांची वय पाहता खऱ्या अर्थाने ही मुले “सुवर्ण युगात” जन्माला आली आहेत असे म्हणावयास हरकत नाही कारण “भारत हा जगात बलवान” होणारा देश आहे लवकरच “भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता” असणारा देश होणार असल्याचे सांगून ते म्हणतात.

ज्या गतीने मुले शिकत आहेत त्या गतीने शिक्षकांनी व त्या मुलांच्या पालकांनी बदलण्याची गरज असून आजच्या मुलांसमोर माहितीचे भांडारा आहे. प्रत्येक गोष्टीचे नॉलेज त्यांच्यासमोर आहे त्यांना कोणत्या गोष्टीची अडचण आली की, ते तात्काळ मोबाईलवर पाहत आहेत. म्हणून खरंतर मुलांबरोबर आजच्या पालकांनी मित्रत्वाचे नाते ठेवले तर निश्चित मूल एका वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही.
कारण भविष्यात भारताच्या मनुष्यबळाची गरज प्रत्येक देशाला लागणार असून काही वर्षांमध्ये प्रत्येक खेडेगावातील एक दोन मुले तरी परदेशामध्ये नोकरी करताना पहावयास मिळाली तर आश्चर्य वाट त्याचे कारण नसावे त्यामुळे आजच्या परिस्थितीत फलटणमध्ये चांगल्या पद्धतीची शिक्षण प्रणाली विकसित होणे गरजेचे असून आज भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर सर्व जगाच्या पुढे असून जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल ट्रांजेक्शन करणारा भारत हा क्रमांक एकचा देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आज आपण भाजीपाला विक्रेत्यांना सुद्धा डिजिटल पेमेंट करताना पाहत असून आहे ते स्वीकारून आपल्यामध्ये बदल करून प्रत्येकानेच पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचे मत ही शेवटी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केले.


यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव म्हणाले की, बिल्डर्स असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धा व त्या स्पर्धेसाठी देण्यात आलेला विषय हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे लहानपणापासून मुलांनी मोबाईलचा वापर कसा करावा व किती करावा याचे ज्ञान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असून जबाबदारीने मुलांनी मोबाईल वापरण्याचे ज्ञानही या स्पर्धेमुळे मिळत असून मुले स्वतः विचार करताना दिसत आहे. त्यामुळे हा उपक्रम निश्चितच सुंदर असून सामाजिक संबंधित विषय असल्यामुळे मुलांना यामधून क्रिएटिव्हिटी मिळत असल्याचे तहसीलदार जाधव म्हणाले.


बिल्डर्स असोसिएशन ऑफ फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या चित्रकला स्पर्धा 16 डिसेंबर रोजी घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी “मोबाईल शाप की वरदान” हा विषय देण्यात आला होता.

व या स्पर्धा एकूण 4 गटांमध्ये विभागून घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये जवळपास 7500 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे या स्पर्धेमध्ये मूकबधिर मुलांनी देखील भाग घेऊन बक्षिसे मिळवली असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होताना दिसत होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.