(फलटण/प्रतिनिधी)- फलटण येथील मुख्यालय असलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेस सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कारभाराबद्दल शासकीय लेखा परीक्षक यांनी नुकतेच पार पडलेल्या ऑडिटमध्ये “अ-वर्ग” दर्जा प्रदान केला. संस्थेचे संस्थापक चेअरमन व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संस्थेने आपल्या मजबूत आर्थिक सेवा आणि समुदायाच्या विकासासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी झपाट्याने नावलौकिक मिळवला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देऊन संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच विविध आकर्षक अशा सुविधा, बचत योजना राबवून सर्वसामान्यांना बचतीची माहिती देऊन सहकारास सामील करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे काम केले आहे आणि सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात आर्थिक सहाय्य देऊन ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असेच अविरहित सेवा देऊन भविष्यात संस्थेचे व ग्राहकांची जीवनमान उंचावण्याचे सचिन यादव यांनी यावेळी बोलून दाखवले. गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह संस्थेस मिळालेला हा “अ-वर्ग” सन्मान म्हणजे संस्थेच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शक कारभाराची पोहच पावती आहे. जिल्ह्यातील संस्थेच्या या यशामुळे सहकार क्षेत्रातील इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
तसेच सुरुवातीच्या काळात फक्त सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी संस्थेने पुणे जिल्ह्यात आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची अधिकृत परवानगी मिळवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2019 मध्ये स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील जनतेची यशस्वीपणे सेवा करणाऱ्या या अग्रगण्य सहकारी संस्थेसाठी हा विस्तार एक मोठे पाऊल आहे.आपल्या गतिमान दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसाठी ओळखले जाणारे श्री. यादव यांनी सहकाराच्या सेवा पुणे जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला आहे, ज्याचा उद्देश दर्जेदार आर्थिक उपायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे. सोसायटीच्या विस्तारामुळे पुण्यातील रहिवाशांसाठी, विशेषतः बचत, कर्जे आणि इतर आर्थिक सेवांच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील अशी अपेक्षा आहे.
गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि संस्थेने सातारा जिल्ह्यात विश्वासाचा एक भक्कम पाया तयार केला असून, आपल्या सदस्यांना यशस्वीरित्या आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. या विस्तारासह, या सहकारी संस्थेचे उद्दिष्ट पुण्यात आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आहे. सातारा जिल्ह्यातील गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची यशस्वी घोडदौड पुणे जिल्ह्यात सुद्धा अशीच चालू राहील असा विश्वास संस्तेचे कर्मचारी, ग्राहका आणि सभासदांनी व्यक्त केला आहे.
Back to top button
कॉपी करू नका.