ताज्या घडामोडी

फलटण शहरातील गणेशाचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते:किरकोळ बाचाबाची सोडली तर मिरवणुका शांततेत संप

मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त रस्त्यावर उतरले होते.

फलटण प्रतिनिधी- रात्री उशीरापर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी फलटण शहरातील अनेक मंडळांनी मोठ्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. शहरातील नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणावर “बाप्पाला निरोप” देण्यासाठी पुढे आले होते.

काल दिवसभर छोट्या मंडळांचे व घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया” “मंगलमूर्ती मोरया” “पुढल्या वर्षी लवकर या”
“गणपती गेले गावाला” “चैन पडेना आम्हाला” अशा जयघोषात सर्वत्र गणेशाचे विसर्जन करीत असताना आढळून येत होते.
रात्री मोठ्या मंडळांनी “भव्य दिव्य” अशा मिरवणुकीचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा व नवसाला पावणारा श्रीमंत रामेश्वर महागणपती, झुंजार गणेशोत्सव मंडळ बुधवार पेठ फलटण, मारवाड पेठ गणेशोत्सव मंडळ, मारवाड पेठ फलटण” श्री रंगारी महादेव गणेशोत्सव मंडळ बारस्कर चौक” रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ फलटण, नवचैतन्य गणेशोत्सव मंडळ खाटीक गल्ली, अमरज्योती गणेशोत्सव मंडळ, पवार गल्ली, जय हिंद गणेशोत्सव मंडळ पवार गल्ली उमाजी नाईक गणेशोत्सव मंडळ श्रीमंत दगडी चाळ गणेशोत्सव मंडळा उमाजी नाईक चौक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक फलटण, सांस्कृतिक व कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगर, फलटण, श्रीराम गणेशोत्सव मंडळ जुना सातारा रोड फलटण, बुरुड गल्ली गणेशोत्सव मंडळ फलटण, मलठणचा राजा गणेशोत्सव मंडळ मलटण फलटण, मलठण गणेशोत्सव मंडळ मलठण इत्यादी मोठ्या मंडळांनी भव्य व दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केले होते.
या मिरवणुकीमध्ये वेग वेगळ्या मूर्ती सजवून ठेवण्यात आल्या होत्या त्याच बरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दारुगोळा वाजवण्यात येत होता.
त्याचबरोबर डीजे ढोल ताशाच्या गजरात या मिरवणूका निघालेल्या पाहावयास मिळाल्या यावर्षी जबरीश्वर मंदिर हे पुरातत्व खात्या अंतर्गत मंदिर येत असल्यामुळे त्याच्या परिसरामध्ये डीजे वाजविण्यास प्रशासनाने कडक बंदी केली होती. त्याचबरोबर डी.जे.च्या आवाजाने मर्यादा ओलांडली तर त्यांना कडक सुचना देवून उपाययोजना करीत असताना पोलीस प्रशासन आढळून येत होते. डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन फिरकत असताना आढळून येत होती. फलटण शहरातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर भावी मिरवणुकीमध्ये सहभागी होताना दिसून आले मिरवणुका शांततेत व व्यवस्थित पार पडण्यासाठी फलटण शहर फलटण तालुका व उपविभागीय पोलीस अधिकारी त्याचबरोबर महसूल व उपविभागीय कार्यालय फलटण नगरपरिषद प्रशासन तत्परतेने काम करीत असताना दिसून आले.

फलटण येथील टोपी चौकामध्ये फलटण नगरपरिषद फलटण यांच्यावतीने भव्य स्टेज उभा केले होते. या स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात येत होता.
सिनियर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते किरकोळ वाद विवाद सोडले तर सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या पोलीस प्रशासनाबरोबरच महसूलचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, अप्पर तहसीलदार तुषार गुंजवटे व विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता लोंढे, शाखा अभियंता ननावरे हे सर्व
परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व फलटण नगर परिषद फलटण यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.