ताज्या घडामोडी

माती परीक्षण ही काळाची गरज – डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात

फलटण प्रतिनिधी- शेतीमधून दर्जेदार पिक काढावयाची असेल तर आपल्या शेतामध्ये असणारी माती कोणत्या धर्माची आहे हे तपासून घेणे खूप महत्त्वाचे असून माती परीक्षणाचे फायदे मृदा पत्रिका, जमिनीचे आरोग्य संवर्धन, सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन, हे समजण्यासाठी माती परीक्षण ही काळाची गरज असल्याची प्रतिपादन डॉ. प्राजक्ता खरात मेटकरी यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलीत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या घोष वाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२३-२४ मौजे राजुरी, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिराच्या दुसऱ्या दिवशी माती परीक्षण ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन  करताना डॉक्टर खरात बोलत होत्या.
कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना पाश्र्वभूमी, माती परीक्षण उपक्रम व मार्गदर्शकांचे ओळख याबद्दल सविस्तर माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले यांनी दिली. सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मौजे राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. विनोद घोलप, कार्यक्रमाचे अध्यक्ष व मौजे राजुरी गावचे विद्यमान सरपंच मा. श्री. शिवाजी पवार यांनी राजुरी गावातील सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण महत्व समजून घेऊन माती व पाणी परीक्षण करून घेण्याचे आवाहन उपस्थित गावातील ग्रामस्थांना केले. सदरील कार्यक्रमाला मौजे राजुरी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे व स्वंयसेवक उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वर्षा खराडे व आभार कुमार प्रणव इंगवले यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.