(दुधेबावी/प्रतिनिधी) : जय गणेश फेस्टीव्हल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गेली २७ वर्षे सलगपणे श्री गणेश फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन व त्यामाध्यमातून वृध्द, महिला, तरुण वर्ग, विद्यार्थी वगैरे सर्व समाज घटकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम अखंडित सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे कौतुक केले, त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्रीफळ वाढवून बैलगाडी शर्यतीचा शुभारंभ करताना माजी आमदार दिपकराव चव्हाण, शेजारी मान्यवर. दुसऱ्या छायाचित्रात बैलगाडी शर्यत पाहताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, दत्तात्रय गुंजवटे, हणमंतराव शिंदे, वीज वितरण उप कार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर, सहाय्यक अभियंता महेश ढेंबरे वगैरे. (छाया – सुभाषराव सोनवलकर)
गणेश फेस्टीव्हल अंतर्गत आयोजित बैलगाडी स्पर्धा प्रसंगी उपस्थित राहुन स्पर्धक व त्यांचे सहकारी, तिरकवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचेशी सुसंवाद करताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी पोलिस पाटील संघटना प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, जयकुमार इंगळे, दिपक झगडे, पत्रकार कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले, पत्रकार विनायक शिंदे, पत्रकार सचिन मोरे, संतोष दगडे पाटील, फलटण तालुका बैलगाडी संघटना अध्यक्ष रोहित यादव, मोहनराव यादव, जगदीश शिंदे आदी मान्यवरांसह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील ३७६ बैलगाडी स्पर्धक, त्यांचे सहकारी आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेले विविध जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश फेस्टिव्हल तिरकवाडी बैलगाडा शर्यती चा प्रथम क्रमांकाचे मानकरी भैय्या येळे पारितोषिक स्विकारताना
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक श्री संत बाळूमामा प्रसन्न ओमकार भैय्या येळे, तिरकवाडी यांनी पटकावला त्यांना मान्यवरांच्या हस्ते आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने १ लाख रुपये रोख, भाडळी खुर्द सरपंच सौ. मोनिका पिसाळ यांच्यावतीने श्री गणेश केसरी चषक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
द्वितीय क्रमांक ७१ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह श्री काळूबाई प्रसन्न कु. वैष्णवी पाटोळे वडकी पुणे यांना धनंजय पवार, सचिन रणवरे, सरफराज शेख, योगेश दळवी, शिवाजी कोकरे यांच्यावतीने, तृतीय क्रमांक ५१ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह महाराष्ट्र केसरी शंकर फॅन्स क्लब, तिष्णाव कल्याण, ढवळ फलटण यांना राहुल गाढवे, सुदामराव शिंदे, संपत लोणकर यांच्यावतीने, चतुर्थ क्रमांक ३१ हजार रुपये रोख सन्मान चिन्ह, संत बाळूमामा प्रसन्न पै. निलेश भाऊ मदने, निंभोरे वस्ताद किसन भाऊ बोडरे लोणंद यांना दत्तात्रय गुंजवटे, बाळासाहेब भांडवलकर यांच्यावतीने, पाचवे २१ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम यांना सतीश नाळे, पुणे यांच्यावतीने, सहावे बक्षीस ११ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह महेश जाधव, मुंबई यांचे वतीने आई काळूबाई प्रसन्न मरिमाता प्रसन्न चौणेश्वर प्रसन्न सूरज महादेव वाडकर, चिखली यांना, सातवे बक्षीस १० हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह श्री स्वामी समर्थ प्रसन्न कै. सुखदेव दत्तू फडतरे वाकेश्वर यांना, याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते सर्व बक्षिसे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मंडळाचे अध्यक्ष आनंदराव सोनवलकर, कार्याध्यक्ष नानासाहेब काळुखे, उपाध्यक्ष रमजान पठाण, खजिनदार सुनील कदम, सचिव चंद्रकांत पवार सर आणि सदस्य गजानन बोराटे, श्रीहरी भिसे, पोपटराव आडके, सुनील शिंदे, बापुराव सोनवलकर, ज्ञानेश्वर बनकर फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष श्रीधर कदम, उपाध्यक्ष विलास सोनवलकर, खजिनदार फिरोज पठाण, सचिव अभिनय लोणकर यांच्यासह तिरकवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झेंडा पंच धनावडे बापू कोरेगावकर आणि समालोचक सुनील मोरे पेडगावकर व विकास जगदाळे यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या स्पर्धांचे उद्घाटन सकाळी माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले त्यावेळी स्पर्धक, अन्य मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.