ताज्या घडामोडी
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी परेडसाठी अतिथी म्हणून दादासाहेब काळे यांनी केले महाराष्ट्र सरपंचाचे प्रतिनिधित्व..!
केंद्रीय व राज्य मंत्र्यांच्या हस्ते सरपंच प्रतिनीधी म्हणून विशेष सत्कार

(बिजवडी /प्रतिनिधी)- नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी अतिथी म्हणून महाराष्ट्रातून 36 सरपंचांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.त्यात माण तालुक्यातील आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांचा समावेश होता.या कार्यक्रम स्थळी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सरपंचांचे महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची संधीही दादासाहेब काळे यांना देण्यात आली होती.त्यावेळी केंद्रीय व राज्य मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी परेडप्रसंगी महाराष्ट्रातील 36 गावच्या सरपंचांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.त्या सर्व सरपंचांचे प्रतिनीधीत्व मला करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.यावेळी माझा केंद्रीय व राज्य मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयाभाऊ गोरे,अरूण गोरे, अर्जुनतात्या काळे,जि.प.कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,उप कार्यकारी अधिकारी अर्चना वागमळे,गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे तसेच आंधळी ग्रामस्थांच्यामुळे मला ही अनमोल अशी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
– दादासाहेब जगन्नाथ काळे ,लोकनियुक्त सरपंच आंधळी ता.माण
