ताज्या घडामोडी

संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री.क्षेत्र पंढरपूर ते श्री.क्षेत्र घुमाण (पंजाब) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन : फलटण येथे पहिला मुक्काम

फलटण मध्ये पहिला मुक्काम असणार

फलटण / प्रतिनिधी : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून ही सायकलवारी कार्तिक शुध्द एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्री. क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र घुमाण कडे प्रस्थान ठेवेल अशी माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे यांनी दिली. 

भांबुरे म्हणाले भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ,  श्री नामदेव दरबार कमिटी,  घुमाण व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे २५०० किलोमीटरच्या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते. वारीचे हे चौथे वर्ष आहे. रविवार दि. २ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर २०२५ या दरम्यान या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्तिक शु|| एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे . या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर सायकल रायडिंग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकलपटूनी सहभाग नोंदविला आहे. ही रथ यात्रा व सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रीयस्तरावर निघणारी ही देशातील पहिली आध्यात्मिक सायकल वारी असून या वारीद्वारे भागवत धर्माच्या शांती, समता आणि बंधूता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.

या वेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास महाराष्ट्र राज्य समन्वयक बापूसाहेब उंडाळे पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे , सल्लागार डॉ राजगोपाल खंडेलवाल आदी उपस्थित होते .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.