पुणे प्रतिनिधी- माण तालुक्याची माजी आमदार धोंडीराम वाघमारेंनी सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन काम केले. त्यांच्या कामाची आठवण सतत पुढच्या पिढीला व्हावी यासाठी आपण त्यांचे छान स्मारक उभारले आहे. त्यांनी मान तालुक्यातील सर्वसामान्य माणसासाठी काम केलेले आहे आणि म्हणून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे आपण जपावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी केले.
मागील आठवड्यात स्व.धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारकाचे उदघाटन राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. त्यानिमित्ताने धोंडीराम वाघमारे यांचे सुपुत्र अभय व त्यांच्या कुटुंबीयांनी पुणे येथे शरदचंद्र पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली व आभार मानले.
यावेळी बोलताना पुढे शरद पवार म्हणाले की, सामान्य, गरीब परिवारात जन्मलेल्या धोंडीराम वाघमारेंनी माण-फलटण तालुक्यातील जनतेसाठी अखंड संघर्ष केला व आपल्या आमदारकीच्या काळात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे म्हणून तुम्ही त्यांचे छान स्मारक उभारले आहे. आता त्यांचा विचार-वारसा पुढे नेण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहुन काम करा.आता तुम्ही तुमच्या कर्तुत्वातून अभय वाघमारे कोण आहेत हे, लोकांना दाखवून दिले आहे. यापुढे मुंबईतील व्याप थोडा कमी करून माण, खटाव व फलटणकडे लक्ष द्या, असा सल्ला यावेळी पवार साहेबांनी दिला.
यावेळी अभय वाघमारे यांच्या सोबत त्यांच्या आई श्रीमती निर्मला वाघमारे, बहीण सोनाली व क्रांती उपस्थित होत्या. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार साहेबांचे आभार मानले.
Back to top button
कॉपी करू नका.