ताज्या घडामोडी
क्रांती शौर्य सेनेच्या सौ.कल्याणी वाघमोडे यांचे दिल्ली येथील जंतर-मंतरवर धनगर आरक्षणाचा पाळणा गात केले अनोखे आंदोलन
शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांनी घेतली आंदोलन कर्त्याची भेट, संसदेत धनगर आरक्षण प्रश्न लावून धरणार दिले आश्वासन

नवी दिल्ली प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला दिलेल्या शब्दाचे पालन करावे धनगर जमातीला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी मोदींनी निवडणुकीत दिलेल्या शब्दाला जागून तात्काळ धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी व आपण दिलेल्या शब्दाला जागावे या प्रमुख मागणीसाठी नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर क्रांतीशौर्य सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. कल्याणी वाघमोडे यांनी आपल्या असंख्य समाज बांधवांसह आंदोलन छेडले.

यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सौ. कल्याणी वाघमोडे म्हणाल्या की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ( ST आरक्षण) अंमलबजावणी करणेसाठी धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अती मागासलेल्या समाजाला घटनेच्या कलम ३४०, ३४१ ,३४२ अन्वये सोयी सवलती दिले आहेत त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश सुधारणा कायदा १९५० व १९७६ या कायदा क्रमांक १०८ नुसार परिशिष्ट (१)मधील भाग (९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुक्रमांक ३६ वर ओरान, धनगर या जातीचा महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमधे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
बिहार, झारखंड, ओरिसा मधे ओरान, धनगर ( Oraon,Dhangar) हे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असल्याचे नमूद करून पुढे वाघमोडे म्हणतात की, धनगर समाज नव्याने आरक्षण मागत नाही घटनेत असलेले आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलने, मोर्चे करत आहे. राज्य सरकार पुन्हा शब्दछल करत फसवणूकच करत आहे त्यामुळे धनगर जमातीचा रोष वाढत चाललेला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला दिलेल्या शब्दाचे पालन करावे असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले.

७ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ व राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष लक्षवेधी घेत सरकारने याची दखल घ्यावी. यासाठी याठिकाणी यळकोट यळकोट… जय मल्हार, आरक्षण अंमलबजावनी झालीच पाहिजे… एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे… ओबीसी जनगणना झालीच पाहिजे… फसव्या सरकारच जाहीर निषेध…या घोषणांनी जंतर मंतर मैदान दणाणून सोडले यावेळी या महिलांनी बाळा जो जो रे… हे अंगाई गीत गात सरकारला झोपवण्याचा इशारा पाळणा आंदोलनातून दिला.




