फलटण प्रतिनिधी- हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छ. शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली याचवेळी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयआयटी सेंटरच्या वतीने एका अनोख्या पद्धतीचा उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. असल्याची माहिती सेंटरचे संचालक शेखर कांबळे यांनी दिली आहे.
यावेळी सविस्तरपणे माहिती देताना ते म्हणाले की, आमच्या सेंटरच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गड किल्ले स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतली होती.
फलटण पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेला “संतोषगड” हा किल्ला समुद्रसपाटीपासून २९०० फूट उंच आह किल्ल्याला मुख्य तीन दरवाजे असून गोमुक स्थापत्य शैलीत बनविलेले आहेत व आत मध्ये अंतर्गत एक गुप्त दरवाजा आहे. गडावर आजही विहिरीला पाणी आहे.
डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी सेंटरचे सर्व विद्यार्थी पायी चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा प्रवास सुरू झाला ताथवडा या गावात पोहोचल्यानंतर गावातील सर्व माननीय सदस्यांनी ग्रामसेवक सरपंच व इतर ग्रामस्थ यांनी आम्हा सर्वांचे जोरदार स्वागत केले व या मोहिमेबद्दल आमचे कौतुक केले.
कचऱ्याचे विघटन कुठे व कसे करायचे याची आम्हाला व्यवस्थित सूचना दिली. दोन तास गड चढून गेल्यानंतर गडाची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोवाडा भारुड व स्वतःचे मनोगते ही व्यक्त केली सर्व महिला स्टाफ ने मिळून बाळ शिवबाचा पाळणा गायला.
अतिशय उत्साहात ही एक आगळीवेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला असे शेवटी कांबळे म्हणाले.