फलटण प्रतिनिधी- स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या प्रतिमेस केले अभिवादन.
श्रीमंत रामराजे यावेळी म्हणाले की, फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे राजमाता जिजाऊंचे आजोळ घर होय, त्यांच्या आई म्हाळसाबाई ह्या नाईक निंबाळकर घराण्याच्या कन्या होत्या.
खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्मितीचे बीज रोवले. जिजाऊंनी महाराजांना देशप्रेम, युद्धकौशल्य, राज्यकारभाराचे बाळकडू दिले. मातृशक्ती आणि सक्षम स्त्रीशक्ती याचे आदर्श उदाहरण राजमाता जिजाऊ यांच्या रुपाने आपल्याला लाभले आहे. स्वराज्य स्थापना आणि लोककल्याणकारी राज्याच्या उभारणीचा प्रेरणास्रोत ठरलेल्या राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
Back to top button
कॉपी करू नका.