ताज्या घडामोडी

फलटणचे माजी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची मुंबई उपनगराच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

फलटण प्रतिनिधी- आस्था टाईम्स – महाराष्ट्र महसूल प्रशासनामधील एक कार्यक्षम अधिकारी तथा फलटणचे माजी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची मुंबई उपनगरच्या अतिरिक्त उपजिल्हाधिकारी या पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र महसूल प्रशासनामध्ये सचिन ढोले यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख  निर्माण केली आहे.  त्यांनी फलटण येथे प्रांताधिकारी म्हणून काम करीत असताना तालुक्यातील वंचित लोकांच्या कामांना प्राधान्य देऊन काम केले. त्यांचे दात नेहमी सर्वसामान्य नागरिकांसाठी सतत खुले असावयाचे सकाळी नऊ रात्री नऊ असे कामकाज करणारे अधिकारी म्हणून सचिन फुले पाटील यांची फलटण तालुक्यामध्ये ओळख निर्माण झाली होती. त्या कारणामुळे आजही फलटणकर नागरी त्यांच्या कामकाजाची आठवण काढत असतात. अगदी एकदा सर्वसामान्य नागरिक जर कोणतीही अडीअडचण घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात आला तर ऑफिसच्या पायरीवर सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटत नव्हता.

सचिन ढोले यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले होते. त्याबद्दल सर्व निवडणूक कर्मचारी यांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले होते. त्यांनी यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज केले आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.