आपला जिल्हा

जि.प प्राथ.शाळा पाटणेवाडी येथे भीमराव कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

(फलटण : प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र – खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार श्री.भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.भीमराव कांबळे हे याच शाळेचे विद्यार्थी असल्याने शाळेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आपणही याच शाळेत शिकल्याचा आपल्याला अभिमान वाटत असून शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत हे बघून समाधान वाटल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी येथील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांमध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत निवडली जात आहेत. त्यामध्ये सन २०२४ साली कैवल्य विजय बोरावके, सन २०२५ साली ईश्वरी गणेश पवार व प्रणव प्रशांत जगताप यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. कैवल्य विजय बोरावके यांनी राज्यस्तरावरती 14 वी, विभागीय स्तरावरती 9 वी तर केंद्र स्तरावर चौथी रँक प्राप्त केली आहे.ईश्वरी गणेश पवार हीने राज्यस्तरावर 6 वी, विभागीय स्तरावर 1 ली रँक प्राप्त केली आहे. प्रणव प्रशांत जगताप यांनी राज्यस्तरावर 15 वी, विभागीय स्तरावर 10 वी तर केंद्र स्तरावर 5 वी रँक प्राप्त केली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ही करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विशाल शंकर हाळनोर, उपशिक्षक मतीन महंमद अली शेख,अंगणवाडी सेविका शोभा गोरख जाधव, अंगणवाडी मदतनीस दीपा भोसले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल सर्जेराव भांडवलकर, युवा कार्यकर्ते श्रीकांत भांडवलकर आणि गणेश काळे, पालक शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.