फलटण : भारतीय स्वातंत्र्यदिनी संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या प्रशासकीय राजवटीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेत संबंधित विभागाच्या मुख्यालयातील प्रशासकीय प्रमुखांना झेंडावंदन करण्याचा मान शासनाच्या वतीने देण्यात आला आहे, परंतु याला फलटण पंचायत समिती अपवाद ठरली असून चक्क फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व प्रभारी गटविकास अधिकारी यांनीच संयुक्त झेंडावंदन केल्याने फलटणचे प्रशासन नक्की कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्याने जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीमध्ये सभापती व नगर परिषदा येथे नगराध्यक्ष हे पद रिक्त असल्याने संबंधित विभागाच्या प्रमुखांनी झेंडावंदन केल्याचे मागील चार वर्षापासून दिसले आहे, याला फक्त फलटण पंचायत समिती अपवाद असून आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन विधानसभेचे आमदार सचिन पाटील व प्रभारी गटविकास अधिकारी कुंभार यांनी संयुक्तपणे केले, शासकीय नियमानुसार १ मे कामगार दिनी मुख्यशासकीय कार्यालयाच्या प्रांगणातला झेंडावंदनाचा मान विद्यमान आमदारांना असतो, परंतु फलटण पंचायत समितीच्या आवारात केलेले संयुक्त झेंडावंदन लोकशाही न मानणाऱ्या लोकप्रतिनिधींना कसे काय समजणार ? असाही सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.