आपला जिल्हा

फलटणमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांची पत्रकारांशी ग्रेट भेट ; हितगुजाचा रंगतदार कार्यक्रम

(फलटण /प्रतिनिधी) – पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बालशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात “रोखठोक” पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. प्रसन्न जोशी यांची फलटण येथे पत्रकारांशी ग्रेट भेट झाली. या भेटीत पत्रकारांमध्ये सखोल हितगुज रंगले.

भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू करून पत्रकारितेची भक्कम पायाभरणी करणाऱ्या जांभेकरांच्या कार्याचा उल्लेख करत प्रसन्न जोशी यांनी ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उपस्थित पत्रकारांना निडर, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारिता करण्याचे मार्गदर्शन केले.

या वेळी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांची विशेष उपस्थिती होती.

या बैठकीस दैनिक पुढारीचे पोपटराव मिंड, आस्था टाइम्सचे संपादक दादासाहेब चोरमले, दैनिक प्रभातचे तथा माजी नगरसेवक अजय माळवे, दैनिक पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी तसेच देवत्व बेकर्सचे संचालक यशवंत खलाटे पाटील, धैर्य टाइम्सचे संपादक सचिन मोरे, सातारा न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र बोंद्रे आणि श्री हरी सुभाषितचे कार्यकारी संपादक युवा पत्रकार यश सुभाष भांबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button