(फलटण/ प्रतिनिधी)-फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुरेश पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच विवाहाच्या सुवर्णमहोत्सवी ५० वर्षे वर्षपूर्तीचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम नवलभाई मंगल कार्यालय फलटण येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात व उत्साहात पार पडला.या विशेष कार्यक्रमा प्रसंगी सुरेश पवार यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील मान्यंवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचे वातावरण पहावयास मिळाला. सजावट, स्वागत व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे सोहळ्याला अधिकच रंगत आली.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुरेश पवार यांची “साखर तुला” हा उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा ठरला.
सुरेश पवार यांची साखरेत तुला करून समाजोपयोगी कार्यासाठी त्या साखरेचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समाजाला काहीतरी परत देण्याचा सुंदर संदेश या निमित्ताने पवार कुटुंबीयांनी सर्वांना दिला.तुला करण्यात आलेली साखर मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच वारकरी संस्थेला देण्यात आली. यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर वारकरी संस्थेलाही या उपक्रमाचा मोठा लाभ झाला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांनी सुरेश पवार यांच्या आयुष्याचा गौरव करताना त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक कार्याचीही प्रशंसा करण्यात आली.एकंदरीत, वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस हा केवळ आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा आदर्श कार्यक्रम ठरला.शेवटी या निमित्ताने उपस्थित मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Back to top button