आपला जिल्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने श्रीमंत रामराजे यांनी दिला सामाजिक समतेचा संदेश

(फलटण/ प्रतिनिधी)- 14 एप्रिल रोजी भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फलटण शहरांमध्ये मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी केली जात आहे या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांना सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.

श्रीमंत रामराजे यांनी लिहिलेल्या संदेशात ते म्हणतात की,समतेचा विचार, हाच विकासाचा आधार  असून “शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा..!” हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या क्रांतीमंत्राला प्रमाण मानून , आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगून श्रीमंत रामराजे म्हणतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण यांच्या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करताना मला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो.”बहुजन समाजाची प्रगती ही केवळ एका व्यक्तीची प्रगती नसून, ती संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे.”शिक्षण आणि संयम ही आपली खरी आपली शस्त्रे आहेत. शस्त्रांचा वापर करून
आपण सर्वांनी महामानवांच्या समतेचा आणि न्यायाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला पाहिजे.

हा उत्सव केवळ आनंदाचा नाही, तर विचारांच्या जागरणाचा आणि परिवर्तनाचा सोहळा आहे. तर चला, आपण सर्वजण एकत्र येऊया आणि एका प्रगत व समतावादी समाजाचे स्वप्न साकार करूया! असेही शेवटी श्रीमंत रामराजे आपल्या संदेशात म्हणतात.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button