आपला जिल्हाताज्या घडामोडी

श्रीमंत संजीवराजे यांच्या प्रयत्नातून बायोगॅस प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकरी इंधनस्वावलंबी : युद्धकाळातही टंचाईची चिंता नाही

(फलटण /प्रतिनिधी) – फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी स्वस्त व पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध व्हावे यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी महत्त्वाचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना गाई-म्हशींच्या शेणापासून बायोगॅस तयार करण्यासाठी गोटे व बायोगॅस प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आले होते.

या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात स्वयंपाकासाठी लागणारा गॅस थेट शेणापासून तयार होऊ लागला. त्यामुळे एलपीजी सिलेंडरवर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले.

सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इजराइल अमेरिका यांनी इराण बरोबर सुरू केलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊन अनेक ठिकाणी एलपीजीची टंचाई जाणवत आहे. मात्र, बायोगॅस प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या परिस्थितीत इंधनाची कमतरता जाणवत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या मते, गाईंच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसमुळे स्वयंपाकासाठी सतत इंधन उपलब्ध होते. तसेच या प्रक्रियेतून तयार होणारे स्लरी खत म्हणून शेतीत वापरता येत असल्याने शेतीसाठीही फायदा होत आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला असून आजच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीव राजे यांना अनेक शेतकऱ्यांचा दुवा मिळताना दिसत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button