आपला जिल्हा

जिंतीच्या हरिभाऊ रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या राज्य कौन्सिलवर निवड

(फलटण/ प्रतिनिधी)- जिंती येथील प्रगतशील बागायतदार हरिभाऊ परबतराव रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या संचालक पदी (राज्य कौन्सिल सदस्य) म्हणून निवड करण्यात आली आहे.

हरिभाऊ रुपनवर जिंती येथील ज्येष्ठ नेते तथा फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष गोकुळ तात्या रुपनवर यांचे बंधू असून त्यांनी खंडकरी शेतकरी यांच्यासाठी कायम लढा उभारला..!

हरिभाऊ रुपनवर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपकराव चव्हाण सर, फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवकांचे आशास्थान श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button