ताज्या घडामोडी

फलटणमध्ये ‘१००% शुगर मुक्त’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; मधुमेह रुग्णांना आरोग्यदायी जीवनशैलीचे मार्गदर्शन

(फलटण/ प्रतिनिधी) : फलटण येथे डायबेटीस मुक्त आयुर्वेदिक जीवनशैली अभियानांतर्गत रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण व आनंदी कन्सल्टन्सी वडूज यांच्या वतीने शुक्रवारी (दि.६) ‘१००% शुगर मुक्त होणार’ या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराजा मंगल कार्यालय येथे झालेल्या या शिबिराला मधुमेह रुग्णांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये सहभागी रुग्णांची रक्तातील साखरेची मोफत तपासणी करण्यात आली तसेच आरोग्यदायी जीवनशैली अवलंबून मधुमेहावर नियंत्रण कसे मिळवता येईल याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मधुमेहातून पूर्णपणे शुगर मुक्त झालेल्या काही रुग्णांनी आपले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले.

सध्या अनेक जण मधुमेहामुळे त्रस्त असून अशा प्रकारची शिबिरे रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या प्रमुख सौ. मधुबाला भोसले यांनी व्यक्त केले. दरमहा अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. मधुबाला भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी नीड फीड इंडिया कंपनीचे कृष्णा जाधव, लायन्स क्लब फलटणचे योगेश प्रभुणे, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे बाळासाहेब ननावरे, डॉ. बळवंत मोरे, आनंदी कन्सल्टन्सी वडूजचे संस्थापक अरुण बर्गे, अमृतराव देसाई, महारुद्र तिकुंडे, रक्षक रयतेचा न्यूजचे संपादक नसीर शिकलगार तसेच रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटणचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नंदा बोराटे यांनी केले, तर आभार कृष्णा जाधव यांनी मानले. शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण व आनंदी कन्सल्टन्सी वडूज यांचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी उपस्थितांमधून १० लकी ड्रॉ काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button