आपला जिल्हा

नगर परिषद इमारतीतील सभागृहांच्या नामांतरावरून नवीन वाद निर्माण करण्यापेक्षा : नव्या प्रकल्पांना महापुरुषांची नावे द्यावीत

(फलटण/ प्रतिनिधी ) फलटण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा २५ मार्च २०२६ रोजी फलटण नगरपरिषदेच्या सभागृहात बोलविण्यात आली असून या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक विषय वाद विवाद निर्माण करणारे घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील नगर परिषद इमारती अंतर्गत असलेल्या विविध सभागृह व शॉपिंग सेंटरला यापूर्वीच्या सत्तारूढ पक्षाने दिलेली नावे बदलण्याच्या विषय घेण्यात आले आहेत. या निर्णयावरून सध्या राजकीय वातावरण तापविण्याचा व गढूळ करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसत आहे.

नव्याने सत्तेत आलेल्या भाजपकडून ही नावे बदलून अन्य महापुरुषांची नावे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यामुळे स्थानिक पातळीवरील वातावरण बिघडवून मतभेद आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तरी हा वाद निर्माण करू नये या आशयाचे निवेदन आज शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुळची भाजपची रणनीतीच केंद्र पातळीवरून तालुका पातळीपर्यंत अशीच राहिली आहे की, जाती-जातीत धर्मा-धर्मात वाद लावणे तंटा निर्माण करणे व त्याचा राजकीय फायदा करून सत्ता स्थापन करणे अशी राहिली आहे.

खर तर मागील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध सभागृहांना काही विशिष्ट व्यक्तींची नावे दिली आहेत. या नावांमागे स्थानिक भावना आणि त्या काळातील राजकीय विचारधारा निगडीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, सत्तांतरानंतर नव्या नेतृत्वाने या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय जाणकारांचे मत आहे की, वारंवार नामांतर केल्याने प्रशासनावर अनावश्यक ताण येतो आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच, आधी दिलेल्या नावांचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात.

पूर्वीची नावे न बदलता तसेच शहरात शांतता व समन्वय ठेवण्यासाठी यापुढे शहरात नव्याने उभारण्यात येणारे सभागृह, सांस्कृतिक केंद्रे किंवा इतर सार्वजनिक प्रकल्पांना या थोर महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी ठाम भूमिका अनेकांनी मांडली आहे. या माध्यमातून निश्चितच कोणताही वादविवाद न होता या महापुरुषांचा सन्मानही राखला जाईल आणि विद्यमान नावांवरून होणारे वादही टाळता येतील, असे मत व्यक्त होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, फलटण नगरपरिषद प्रशासन व राजकीय पदाधिकाऱ्यांचा हा नामांतर विषय केवळ राजकीय निर्णय न राहता तो सामाजिक एकात्मता आणि लोकभावना लक्षात घेऊन घेतला गेला पाहिजे. वाद विवाद होणारे विषय घेण्यापेक्षा सत्ताधिकार्‍यांनी वारंवार नाव बदलण्यापेक्षा विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे असल्याचेही जाण करांचे मत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button