ताज्या घडामोडी
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन
जय श्रीराम जय हनुमान या नावाने संपूर्ण शहरात जय घोष


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीला शहरातील व तालुक्यातील असंख्य हजारो तरुणांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री प्रभू रामचंद्र, सीतामाई, जय श्री हनुमान व लक्ष्मणाच्या पारंपारिक वेषात अनेक बालचमूणी उत्स्फूर्तपणे व उत्साहाने सहभाग नोंदविला होता. पारंपरिक उत्साह, धार्मिक भावना आणि आधुनिक आकर्षणांचा संगम असलेल्या या मिरवणुकीने फलटणकराचे लक्ष वेधून घेतले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूढ झालेली भव्य मूर्तीही या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरली. मिरवणुकीदरम्यान आकर्षक दारूगोळा (फटाक्यांची आतषबाजी) आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले होते.
विविध ठिकाणी सजवलेले लाईटिंग आणि डेकोरेशन पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले.डीजेच्या तालावर हजारो युवकांनी उत्साहाने सहभाग घेत “जय श्रीराम”च्या जयघोषात एकच ठेका धरला होता.संपूर्ण परिसर भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला होता. युवकांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग यामुळे मिरवणूक अधिक आकर्षक ठरली.संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी आयोजकांनी तसेच पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. नागरिकांनीही सहकार्य करत उत्सवाचा आनंद लुटला.