(फलटण /प्रतिनिधी) – अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ, रेवा येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी मुधोजी महाविद्यालयाची खेळाडू पूर्वा निलेश खानविलकर हिची शिवाजी विद्यापीठाच्या महिला खो-खो संघात निवड झाली आहे.
पूर्वा खानविलकर ही मध्य प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी नुकतीच रवाना झाली असून तिच्या या यशामुळे फलटण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button