ताज्या घडामोडी
श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन ; अनिल भोईटे अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्ष पदी सौ. अनिता रणवरे

(फलटण /प्रतिनिधी ):जिंती ता.फलटण येथील श्री जितोबा विद्यालय, जिंती येथे माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अनिल मच्छिंद्र भोईटे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सौ. अनिता दत्तात्रय पवार (पूर्वीचे नाव अनिता गणपत रणवरे), सचिवपदी मुख्याध्यापिका सौ. माधुरी ज्ञानेश्वर जाधव (पदसिद्ध सचिव) तर खजिनदारपदी नंदू शेठ नामदेव शेगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष अनिल भोईटे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले की, माजी विद्यार्थी संघटनेचा मुख्य उद्देश शाळा व माजी विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ करून शाळेच्या विकासाला गती देणे हा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या संघटनेच्या माध्यमातून शालेय दर्जा उंचावणे, समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवणे, शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
श्री जितोबा विद्यालय हे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी मंदिरासमान असून शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी तन, मन, धनाने शाळेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेच्या सदस्यांमध्ये ताराचंद्र आवळे, शरदराव रणवरे, यशवंत खलाटे पाटील, नंदकुमार भोसले, सारिका खलाटे (घाडगे), विजय मोरे, ज्योती पवार (दिवेकर), सुनिता शिंदे (बाबर), रोहिणी जाधव (अहिरेकर), दीपा गुजर (चव्हाण), रवींद्र गिरी, वैशाली रणवरे (बळे), अलका रणवरे (कारंडे), अनिकेत रणवरे, नवनाथ रणवरे, नंदकुमार रणवरे, नितीन रणवरे आदींचा समावेश आहे.



