ताज्या घडामोडी

धनगर समाजाचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक निष्फळ

कोणताही तोडगा नाही त्यामुळे १६ मार्च रोजी होणारे आंदोलन ताकतीने करणार मल्हार योद्धे- दीपक बोऱ्हाडे

(आस्था टाईम्स वृत्तसेवा) -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबई येथे 13 मार्च 2026 रोजी पार पडली. या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने कशा पद्धतीने करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला मंत्री गिरीष महाजन, धनगर आंदोलनाचे नेते दिपकभाऊ बोऱ्हाडे, खासदार रामराव वडकुते, सुरेशभाऊ कांबळे, माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, तसेच अनंत बनसोडे, विजय तमनर, महादेव अर्जुन, प्रल्हाद नेमाने, मोहन देवकते आणि धनगर आरक्षण अभ्यासक बिरुदेव कोळेकर यांच्यासह समाजातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा झाली असली तरी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे समाजाच्या वतीने दीपक बोऱ्हाडे यांनी जाहीर करण्यात आलेले 16 मार्च 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणारे आंदोलन नियोजितप्रमाणेच होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्ये दीपक बोऱ्हाडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिष्टमंडळाने बैठकीत मांडली. मात्र निर्णय न झाल्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून येत्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 16 मार्च रोजी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button