ताज्या घडामोडी
श्रीमंत विश्वजीत राजे यांनी मंत्रालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट..!


फलटण परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि इतर स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत विश्वजीतराजे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच संबंधित कामांना प्रशासनाकडून लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले. स्थानिक विकासासाठी शासनाकडून शक्य ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.