ताज्या घडामोडी

सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी कु.वेदांत सूळ व कु.प्रगती सूळ यांची निवड

फलटण प्रतिनिधी- सातारा जिल्हा अँमँच्युअर अँथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे दि. २१ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या सातारा जिल्हास्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेमधे मुधोजी महाविद्यालय  फलटणच्या मैदानावर सराव करणारे कु.वेदांत राजेंद्र सुळ याने लांबउडी या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला व कु. प्रगती राजेंद्र सुळ हिने १०० मी. धावणे या प्रकारात द्वितीय व ६० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला.

या दोन्ही खेळाडू दि. ०९ ते ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सांगली या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशस्वी खेळाडूंना मैदानी खेळाचे मुख्य प्रशिक्षक श्री.राज जाधव आणि क्रीडा शिक्षक श्री.तायाप्पा शेंडगे यांचे मार्गदर्शक लाभले.

या यशस्वी खेळांडूचे एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन व संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष व ग.कौ. सदस्य श्री. शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समिती सचिव श्री. सचिन धुमाळ, क्रीडा समिती सदस्य श्री. महादेव माने यांनी अभिनंदन केले. आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.