खटाव प्रतिनिधी – तडवळे,ता.खटाव येथील पत्रकार दत्तात्रय फाळके यांना राष्ट्रीय युवा चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र विमलाई श्रीमंत सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली काव्यमित्र संस्थेच्या वतीने सलग २०२४ व्या वर्षी आयोजित रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व परिवर्तनवादी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना राष्ट्रीय युवाचेतना पुरस्कार देण्यात आला.

पत्रकार दत्तात्रय फाळके हे डीएसपी न्यूज नेटवर्क यूटयूब चॅनेलचे संपादक, राज्यदैनिक बाळकडू पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख, युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष इत्यादी पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी या संघटनेच्या, संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची तसेच पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मा.सौ.मधुरा मुकुंद भेलके ( अध्यक्षा, म्हसोबा देवस्थान ट्रस्ट , खारावडे , ता.मुळशी ) यांच्या हस्ते ” राष्ट्रीय युवाचेतना पुरस्कार ” देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे मा.सौ. मधुरा भेलके ( अध्यक्षा, म्हसोबा देवस्थान ट्रस्ट खारावडे , ता. मुळशी ), मा.ॲड. तुषार पाचपुते (प्रसिद्ध युवा कायदेतज्ञ पुणे), मा. महेश कदम (उपाध्यक्ष मराठा बिझनेसमन फोरम सातारा) , सौ. अस्मिता सावंत इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.