ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा डॉक्टर्स असोसिएशन बॅडमिंटन स्पर्धा फलटणच्या हृदयरोग तज्ञ डॉ.पुनम पिसाळ विजयी

सातारा- नुकत्याच रविवारी दि. ४/२/२४ रोजी सातारा येथील शाहू स्टेडियम येथे पार पडलेल्या “जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, सातारा” यांच्या वतीने आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये फलटण येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. पुनम जनार्दन पिसाळ व डॉक्टर कदम या दोघींनी यांनी महिला दुहेरी विजेतेपदावर आपली मोहोर उठवली. त्यांनी डॉ. कदम यांच्या साथीने एकही सेट न गमावता सलग ५ मॅचेस जिंकून ही कामगिरी केली.

तसेच सोमवारी दि. ५/२/२४ रोजी फलटण येथे ‘फलटण डॉक्टर्स असोसिएशन’ द्वारा आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि दुहेरी अशा दोन्हीसुद्धा प्रकारात त्या विजेत्या ठरल्या आहेत.त्या व्यवसायाने एम.डी. डॉक्टर (हृदय रोग तज्ञ, मधुमेह तज्ञ) म्हणून फलटण तालुक्यामध्ये ओळखल्या जातात. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी पुणे येथे डिसेंबर मध्ये झालेल्या डॉक्टर्स ऑलिम्पिक मध्ये सुद्धा सहभाग नोंदविला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.