ताज्या घडामोडी

विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाचा विधायक उपक्रम : शेकडो युवकांनी केले रक्तदान

(फलटण/ प्रतिनिधी ): लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकोपा आणि विधायक उपक्रम राबविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन करण्याचा संदेश दिला. मात्र, काळानुरूप गणेशोत्सव उपक्रमाचे स्वरूप बदलत असताना पुन्हा एकदा फलटण येथील रामराजेनगर, रिंगरोड येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून लोकमान्य टिळक यांचे विचार जोपासले आहेत.

विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ स्थापनेपासून एक आदर्शवत मंडळ आहे. मंडळाची स्थापना १९८७ फिरोज बागवान, अमित सस्ते , नौशाद शेख, अमोल सस्ते, जावेद बागवान, सुनील वसव, दिवंगत संतोष उर्फ दिगंबर लंगुटे यांच्या एकजुटीतून करत गेली ३८ वर्ष गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश दिला आहे . तोच आदर्श आता युवा पिढीने पुढे नेत आमिर उर्फ चिकू शेख, अँड.गजेंद्र अडसूळ, आदित्य रणवरे, आकाश वाघ,आरिफ शेख, प्रशांत शिंदे, ऋषिकेश शिर्के, अभिषेक शिर्के, पियूष निंबाळकर, प्रथमेश चव्हाण व इतर सहकाऱ्यांनी एकत्र येत सामजिक ऐक्य व एकोप्याची परंपरा कायम ठेवत यादेखील वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अक्षय ब्लड बँक यांच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी निकम – पाटील हॉस्पिटल येथे मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रक्तदान करत सर्वात श्रेष्ठ दान…रक्तदान हा देखील सामजिक एकोप्याचा आदर्श समाजापुढे घालून दिला. तसेच गणेशोत्सव कालावधीत महिलांसाठी होम मिनिस्टर , रांगोळी स्पर्धा, पाककला, लहान मुलांचे कार्यक्रम तसेच वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रम व गरजू रुग्णांना मदत करण्याचे उपक्रम आणि वर्गणीदार नागरिकांच्या प्रत्येक अडी अडचणींना धावुन जाण्याचे सहकार्य यासह व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम व इतर देखील समाजउपयोगी उपक्रम तसेच दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन हे विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ राबवित पुढील वाटचाल करीत आहे.

या उपक्रमासाठी मंडळाचे सहकारी आदित्य पवार, सुफियान शेख, निनाद मोरे, आकीब शेख, अथर्व कदम, प्रतीक मोरे, सिद्धांत दोशी, स्वप्नील गायकवाड, सुयश कर्णे, ओंकार रणवरे, सौरभ यादव, गौरव कदम, रणजित शेडगे आदी. परिश्रम घेत असून ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शनाने मंडळाची वाटचाल सुरू आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.