ताज्या घडामोडी

सृजन बिचुकले याची १६ वर्षाखालील विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

फलटण प्रतिनिधी- श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लबचा खेळाडू सृजन बिचुकले याची सुरत (गुजरात) येथे होणाऱ्या १६ वर्षा खालील विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धे साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य आमंत्रित क्रिकेट स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचे कर्णधार पद भूषवत सृजन बिचुकले याने फलंदाजी मध्ये उच्चांकी ४५० रन्स बनवल्या ज्यामध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश असून गोलंदाजी मध्ये १९ विकेटस् मिळवत सृजनने कर्णधार पदाला साजेशी कमिगिरी केली असल्यामुळेच या उत्कृष्ठ कामगिरी च्या जोरावर त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
त्याला श्री. मिलिंद सहस्त्रबुद्धे सर श्री. सोमनाथ चौधरी सर श्री. मिलिंद ( टिल्लू )चौधरी सर, श्री.संदेश साळुंखे यांचे मार्गदर्शन तसेच श्री.सदानंद प्रधान सर यांचे आशिर्वाद लाभले आहेत.
सृजनच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती तथा आ.श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लबचे सलग २ वर्षे २ खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागच्या वर्षी याच स्पर्धेत यशराज मदने याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.