ताज्या घडामोडी

वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज- श्रीमंत शिवांजलीराजे ना. निंबाळकर

जायंटस ग्रुप ऑफ फलटण सहेलींच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

फलटण प्रतिनिधी- आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जागतिक तापमानवाढ हा विषय गंभीर बनला असून या विषयावर वेळीच तोडगा काढावयाचा असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन ही मोहीम हातात घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील श्रमिक महिला वसतिगृहाच्या आवारात जायंटस ग्रुप ऑफ सहेलीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीमंत शिवांजलीराजे बोलत होत्या.


यावेळी उपाध्यक्षा सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका पी.आर.ओ. सौ.वैशाली चोरमले, संचालिका सौ.लतिका अनपट, सौ.मेधा सहस्रबुद्धे, श्रीमती.विद्या गायकवाड़, सौ. प्रतिभा शहा, सौ. प्राची फडे, कार्यवाह सौ.राजश्री शिंदे आणि वसतिगृहाच्या अधिक्षक शेख मॅडम इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


यावेळी बोलताना पुढे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे म्हणाल्या की, जागतिक तापमान वाढीमुळे अवेळी पाऊस, भूकंप, सुनामी, ज्वालाग्रहिचा उद्रेक, तीव्र दुष्काळ, वादळे, उष्णतेच्या लाटा, समुद्राची वाढती पातळी, वितळणारे हिमनदी आणि तापमान वाढणारे महासागर प्राण्यांना थेट हानी पोहोचवू शकतात, त्यांची राहण्याची ठिकाणे नष्ट करू शकतात आणि लोकांच्या जीवनमानाचा आणि समुदायांचा नाश करू शकतात इत्यादी गंभीर परिणाम जागतिक तापमान वाढीमुळे होऊ शकतात यावर एक मात्र उपाय आहे तो म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याचेही शेवटी श्रीमंत सौ. शिवांजलीराजे म्हणाल्या.
यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहलीच्या वतीने परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.