ताज्या घडामोडी
अनुबंध कला मंडळ आयोजित सन्मान अथक परिश्रमाचा हा आगळ्यावेगळा कार्यक्रम समाजाला प्रेरणादायी- श्रीमंत रामराजे

फलटण प्रतिनिधी- अनुबंध कला मंडळ यांच्या वतीने समाजामध्ये तब्बल ५० वर्षाहून अधिक काळ उन्हातान्हात अखंडित कष्ट करीत राहणाऱ्या कामगाराना वंदन हा आगळ्यावेगळा कार्यक्रम समाजाला निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
अनुबंध कला मंडळ आयोजित सन्मान अथक परिश्रमाचा या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते.
याप्रसंगी फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी अनुबंध कला मंडळाचे बकुळ पराडकर, विजय जाधव इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, समाजातील नोकरवर्ग आपल्या जीवनामध्ये तीस-पस्तीस वर्षाची सेवा करून तो निवृत्त होत असतो निवृत्त झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळते त्याचा मानसन्मान केला जातो मात्र वर्षानुवर्षे अनेक सामान्य नागरिक आपल्या गावात राहत असताना अखंडित उन्हातानात पावसात मोल मजुरी उदाहरणार्थ सुतार गवंडी बिगारी अशी कामे करीत असतात आणि अशा कामगारांना कुठेतरी बहुमान मिळावा या भावनेने अनुबंध कला मंडळाने समाजातील अपार कष्ट करणाऱ्या माणसांना शोधून त्यांचा मान सन्मान केला आहे म्हणूनच या कार्यक्रमाला सन्मान आदर्श परिश्रमाचा असे म्हटले आहे असे उपक्रम निश्चितच समाजातील अनेक संस्थांना प्रेरणादायी ठरतील व त्यांच्याकडून ही अशा वंचित गोरगरीब नागरिकांची सेवा घडेल अशी अपेक्षा ही शेवटी श्रीमंत रामराजे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
प्रास्ताविकात बकुळ पराडकर यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करीत असताना सांगितले की, ” सन्मान अथक परिश्रमाचा “
वर्षानुवर्षे आपण आपल्या गावात राहात असतो रस्त्याच्या आसपास छोटी-मोठी काम करणारे कष्ट करणारे कामगार मग ते कुणी चर्मकार कुणी केश कर्तनकार कुणी स्वच्छक कुणी बर्फाचे गोळे विकणारा कुणी धार लावणारा अशी अगदी साधीसुधी काम करणारी अनेक माणसे आपल्या गरजांना धावून येतात. गरजेच्या वेळी आपण त्यांच्याकडे जातो, काम करून घेतो पण नंतर हे सर्व आपल्या खिजगणती ही नसतात. आपण नोकरदार वर्ग साधारणता ३५, ३६ वर्षापर्यंत काम करून सेवानिवृत्ती घेऊन आरामात जीवन जगत असतो पण हे कामगार मात्र उन्हातान्हात, पावसात समाजासाठी कोणी ५० कोणी ६० कोणी ७० वर्षे अखंडित कष्ट करत राहतात. समाज उभारणीसाठी त्यांचे योगदान सहजी कुणाच्या लक्षात येत नाही.
असे अखंडित ५०वर्षे ६० वर्षे ६५ वर्षे कष्ट करणारे कामगार अनुबंध कला मंडळाला दिसले आणि वाटलं किती मोठे हे कष्ट यांचे हे कष्ट अधोरेखित व्हायला हवेत त्यांचाही सन्मान, सत्कार करून कृतार्थता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठीच अनुबंध कलामंडळाने हा “सन्मान अथक परिश्रमाचा” हा उपक्रम करण्याचे आम्ही निश्चित केले व
२०२४ साली अशा कामगारांचा सत्कार करण्याचा पहिला कार्यक्रम अनुबंध कलामंडळाने यशस्वी केला. त्यानंतर यावर्षीचा तिसरा कार्यक्रम दिनांक १८ मे २०२५ रोजी जोशी हॉस्पिटलच्या सभागृहात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद यांच्या हस्ते अशा अखंडित कष्ट करत राहणाऱ्या दहा कामगारांचा सत्कार शाल, पुष्पहार, मिठाई व अनुबंधकला मंडळातर्फे छोटीशी आर्थिक भेट चे पाकीट देऊन संपन्न करण्यात आला असल्याचे बकुळ पराडकर यांनी सांगितले.
लक्ष्मण देशपांडे, प्रकाश मोहिते, रत्नाकर कासार, रोहिदास सोनवणे, राजेंद्र विष्णू माने, श्रीमती सुगंधा जगताप, गुलाब इनामदार, हनिफ तांबोळी, बळवंत पाटील आणि श्रीमती आशा दरेकर
यासाठी फलटण शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उत्साहात हजर राहिले आणि त्यांनी या कामगारांना प्रोत्साहन दिले याबाबत अनुबंध कला मंडळ तर्फे सर्वांचे आभार मानण्यात येत आहेत. अशा आमच्या अनेक सामाजिक कार्यक्रमांना पाठबळ देणाऱ्या डॉ. जोशी यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.