फलटण प्रतिनिधी- 30 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून 1995 साली गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची सुरुवात करण्यात आली. यामागे एकच भावना होती की फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा व त्यांच्या शेतीला जोडधंदा मिळून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने आम्ही गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची सुरुवात केली.अगदी सुरुवातीच्या काळात 25 ते 30 हजार दूध संकलन करण्यात येत होते यासाठी एक छोटा चिलिंग प्लांट आम्ही टाकला होता व ते दूध आम्ही कॅडबरी कंपनीला देत होतो. २५ हजार लिटर दूध संकलन आज ३.५ लाख लिटरवर जाऊन पोहोचले असल्याचे सांगून पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणतात गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आज वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करीत असल्या मुळेच आज “गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” हा एक “महाराष्ट्राचा महाब्रँड” म्हणून नावारूपाला आला आहे याचा मनोमन आनंद आम्हाला असल्याचे प्रतिपादन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सर्वेसर्वा श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले आहे.

यावेळी बोलताना पुढे संजीवराजे म्हणतात की, आज गोविंदच्या माध्यमातून संकलन केल्या जाणाऱ्या दुधापासून दुधाचे छोटे पाऊच त्याचबरोबर फ्लेवर मिल्क, दही, दूध, फ्लेवर लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, मिल्कशेक, बटर, पनीर व दुधाची पावडर इत्यादी पदार्थ तयार केले जातात त्याचबरोबर आज गोविंद टेट्रा मिल्क पॅकिंग बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

अलीकडच्या काळात हळूहळू नवीन पिढी या व्यवसायामध्ये आली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे मात्र या धंद्याला ग्लॅमर नसल्याकारणाने नवीन पिढी इकडे येण्यास उत्सुक नसली
तरी दुधामधून चांगले पैसे मिळावेत हा दृष्टिकोन ठेवून कमीत कमी मजुरांवर हा व्यवसाय कसा करता येईल असा प्रयत्न तरुणांनी केला तर निश्चितपणे त्याना चांगले पैसे मिळू शकतील असे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणतात
आम्ही केवळ दूध या धंद्याकडे फोकस न करता गाईचे शेण, शेणापासून तयार करण्यात येत असलेला गोबर गॅस त्याचप्रमाणे खतांची निर्मिती याबरोबरच
शेतकऱ्यांना चांगल्या कालवडी पुरवणे तसेच त्या कालवडींना योग्य खाद्यपदार्थ कसा देण्यात यावा यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.
त्यामुळेच ३० ते ३५ हजार लिटर दुधाचे संकलन करणारी गोविंद आज जवळपास तालुक्यामधून ३.५ लाख दुधाचे संकलन करीत आहे. सुरुवातीला असे कधीच वाटले नव्हते की, गोविंद आज ज्या प्रगतीपथावर आहे तो आजचा टप्पा आपण गाठू असे कधीच वाटले नव्हते.
केवळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आणि या विश्वासाला पात्र राहुन आम्ही केलेले काम केवळ त्यामुळेच आज आमचा फलटण येथून सुरू झालेला प्रवास हळूहळू देशभर व देशाच्या बाहेर गेलेला आपणाला दिसून येतो असेही शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.
Back to top button
कॉपी करू नका.