फलटण प्रतिनिधी- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त लोणंद तालुका खंडाळा येथे धनगर समाज सर्व पोटजातीचा भव्य वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक डी. बी. ठोंबरे व पी.एम. धायगुडे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की या मेळाव्यात प्रथम, घटस्फोटीत व विधवा इत्यादी वधू-वर येणार असून सदरचा मेळावा लोणंद तालुका खंडाळा येथे रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी रोजी सकाळी १० ते ५ या वेळेमध्ये अमृता मंगल कार्यालय, लोणंद पोलीस स्टेशन समोर आयोजित करण्यात आला असून सदरच्या मेळाव्याला जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी व वधू-वरांनी उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.