सातारा आस्था- टाईम्स वृत्तसेवा – सातारा जिल्हाधिकारी कार्यालय हे आरडीएक्स बॉम्बच्या साह्याने उडवून देणार हा धमकी देण्याबाबतचा ई-मेल आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा व सातारा पोलीस हाय अलर्ट मोडवर आले होते. व सर्व पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली.
तात्काळ पोलिसांनी दक्षता घेऊन दुपारी १ वा. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी व विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तात्काळ कार्यालयाच्या काढले
सातारा पोलीस दलाली विशेषता बॉम्बस्फोट डॉग स्काॅडच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. हे ऑपरेशन सुरू असताना विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र पावसाची व विजेची तमा न बाळगता पोलीस यंत्रणेने सुमारे 3 तासाच्या शोधानंतर बॉम्ब सदृश्य कोणताही धोकादायक पदार्थ आढळला नसल्याचा निर्वाळा पोलिसांच्या वतीने देण्यात आला. व अखेर सर्वांच्याच जिवात जीव आला.
Back to top button
कॉपी करू नका.