फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा – आज पर्यंतच्या हॉस्पिटलच्या रेकॉर्डस् नुसार हा सर्वात लहान पेशंट आहे ज्यावर संधेरोपणाची शस्त्रक्रिया केली गेली.९ महिन्यां पूर्वी खुब्याचे हाड मोडल्याने screw टाकून बसवण्याची शस्त्रक्रिया दुसऱ्या हॉस्पिटल ला केली गेली होती. खुब्याच्या सांध्याचा रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे सांधा खराब झाला आणि प्रचंड वेदना होऊ लागल्या. तो स्वतंत्रपणे चालण्यास असमर्थ झाला . त्याचा पाय सुमारे २ सेमी अपुरा झाला आणि मग १५ वर्षाच्या वयात दैनंदीन जीवन जगणे सुद्धा दुरापास्त झाले .

ऑपरेशन करून त्याचा खराब झालेला खुब्याचा सांधा बदलण्यात आला आणि Ceramic on Poly या प्रकारचा जॉन्सन & जॉन्सन या कंपनी चा ४० वर्षे टिकणारा सांधा बसवण्यात आला.
ऑपरेशन नंतर २ cm आखूड असलेला पाय परत पूर्ववत दुसऱ्या पाया इतकाच लांब झाला आहे.

हा पेशंट आता त्याचे संपूर्ण तारुण्यातील आयुष्य नेहमी सारखे उत्तम रीतीने , दुःख विरहित आणि आनंदाने जगेल यात काही शंकाच नाही असे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांनी नमूद केले.
सध्या कुठल्याही आजारांना आयु मर्यादा राहिलेली नाही असे प्रामुख्यानी डॉ जोशी यांनी आवर्जून सांगितले.
आत्ता पर्यंतच्या हॉस्पिटलच्या इतिहासात एवढ्या लहान वयात सांधेरोपण करावे लागणारा हा पहिलाच पेशंट आहे.
कोरोना नंतर बरेच आजार हे लहान वयात दिसून येत असून आपली शरीराची आणि आरोग्याची काळजी ही आपणच घेणे गरजेचे आहे , मेडिक्लेम काढणे अत्यंत आवश्यक आहे आणि सात्विक आहार , रोजचा व्यायाम आणि सकारात्मक विचार ही त्रिसूत्री पाळा .
Back to top button
कॉपी करू नका.