(फलटण/प्रतिनिधी)फलटण तालुक्यातील नाईक बोंमवाडी येथील शिवजल मंदिर येथे बुधवार दि.26 रोजी सर्वांसाठी खुले होणार आहे.
या प्रसंगी महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बुधवार सकाळी 8 ते 5 या वेळेत भव्य शिवजल ऊर्जा कलशपूजन श्री क्षेत्र नाशिक येथील यज्ञाचार्य वेदोपासक भूषण शुक्ल गुरुजी यांच्या हस्त संपन्न होणार आहे .
यावेळी महायज्ञ शिवाभिषेक स्त्रोत मंत्र पठण करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत अघोरी तांडव संपन्न होणार आहे रात्री 8ते 9 या वेळेत BSR अजमेर कोच भूपेंद्र सिंग राठोड यांचे शिवजल ऊर्जा ध्यान कार्यक्रम होणार आहे रात्री 9ते 10 वेळेस शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांचे शिवजल ऊर्जा ध्यान महाशिवरात्री निमित्ताने होणारे विविध कार्यक्रम फलटण तालुक्यातील शिवभक्तांना आकर्षक ठरणार आहे
Back to top button
कॉपी करू नका.