ताज्या घडामोडी
ब्रह्मकुमारी विद्यालय फलटण शाखेच्या वतीने विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

फलटण: आस्था टाईम्स वृत्तसेवा – ब्रह्मकुमारी विद्यालय शाखा फलटण यांच्यावतीने ब्रह्मकुमारीस विद्यालयाच्या पूर्व मुख्य प्रशासिका दादी प्रकाश मनी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त महार रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. या वेळा वेळेमध्ये ब्रह्मकुमारीज वरदानी भवन महादेव नगर रोड कोळकी फलटण येथे आयोजित केले आहे. अशी माहिती ब्रह्मकुमारी विद्यालय फलटण शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळे अनेकांचे प्राण वाचले जातात म्हणून रक्तदान करणे म्हणजे आपल्याच कोणालातरी जीवनदान देणे आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ब्रह्मकुमारी विद्यालय शाखा फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.