ताज्या घडामोडी
कर्नल विनोद मारवाह फाउंडेशनच्या वतीने गोशाळा सुरु- कर्नल विनोद मारवाह
सामाजिक बांधिलकी मानून गोशाळेचे सुरुवात - कर्नल विनोद मारवाह

फलटण प्रतिनिधी- गोमाता आपली माता आहे. मात्र गाई ज्यावेळी दूध द्यावयाच्या बंद होतात अशा वेळी गाईंना बाजारात विकले जाते व त्यांची हत्या करून त्यांची मांस विक्री होते. हे मी पाहिले आहे त्यावेळीच मी ठरवले की, अशा भाकड गाईंसाठी कर्नल विनोद मारवाह फाउंडेशनच्या माध्यमातून गोशाळा सुरू करावयाची आणि आज ते माझे स्वप्न पूर्ण होताना विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन कर्नल विनोद मारवाह यांनी केले.


आम्ही सर्व भारतीय संरक्षण खात्यामध्ये विविध रँकवर काम करीत असताना १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात आम्ही एकत्रित रित्या पाकिस्तान विरुद्ध लढून भारताला जिंकून दिले होते.
असे सर्व मित्र आम्ही आमच्या फॅमिलीसह फलटण तालुक्याच्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन कापडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील मॅग्नेशिया कंपनी जवळ गोशाळा सुरू केली आहे. ज्यांना आपली भाकड जनावरे सांभाळणे शक्य होत नाही. त्यांनी आपल्या गाई मॅग्नेशिया कंपनी, कापडगाव येथील गोशाळेमध्ये सोडावीत असेही शेवटी कर्नल विनोद मारवाह म्हणाले.


